मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. Source CMO Maharashtra  👉 *मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय :* ✅ राज्य शिखर संस्थेच्या कळंबोलीतील इमारतीसाठी शुल्क माफी ✅ तात्पुरत्या स्वरूपातील ६४ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करणार ✅ मालमत्ता विद्रूपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास. दंड सुद्धा वाढविला ✅ १३८ जलदगती न्यायालयांसाठी वाढीव खर्चाला मान्यता.   ✅ संस्कृत, तेलुगू, बंगाली, गोर बंजारा साहित्य अकादमी स्थापणार ✅ शासकीय, निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण  ✅ विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ. ५० कोटी भागभांडवल ✅ पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात भरीव वाढ. ✅ हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करणार. रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली ‘मॅनहोलकडून मशीनहोल’ कडे योजना ✅ संगणक गुन्हे तातडीने निकाली निघणार. सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबविणार ✅ राज्य पोलीस
अलीकडील पोस्ट

पावणे दोन वर्षांत घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये सामान्य जनतेच्या हिताचे लोकाभिमुख निर्णय- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सगेसोयरे व्याख्यासंदर्भातील अधिसूचनेवरील ४ लाख हरकतींची नोंद व छाननी पुर्ण मुंबई, दि. १६:  राज्य शासनाने गेल्या पावणे दोन वर्षांत आतापर्यंत घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये शेतकरी, कामगार, महिला, युवा, ज्येष्ठ नागरिक असे सामान्य जनतेच्या हिताचे लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. आज घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील जनहिताचे निर्णय घेतले असून त्यामध्ये कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर पद्धतीने लाभ देण्यासाठी ४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सगेसोयरे व्याख्यासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेवर हरकती व सूचनांची छाननीची कार्यवाही सुरू असून ४ लाख हरकतींची नोंद व छाननी पुर्ण झाली आहे. येत्या चार महिन्यात यासंदर्भात कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले. Source CMO Maharashtra  मंत्रिमंडळ बैठकीनंतर सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सर्वश्री धनंजय मुंडे, दीपक केसरकर, संजय बनसोडे यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ११२९ कोटी रुपये किंमतीच्या विविध नागरी प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण

रिकांच्या जीवनात बदल घडवून त्यांचे जीवन सुखी समृध्द होण्यासाठी प्रयत्नशील -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे, दि. १२- हे सर्वसामान्यांचे सरकार असून जनतेच्या जीवनात बदल घडवून त्यांचे जीवन सुखी, समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही देतानाच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ११२९ कोटी रुपये किंमतीच्या विविध नागरी सुविधा प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या तसेच सिडको महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे वर्षा निवासस्थान येथून संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री शंभूराज देसाई, क्रीडा व बंदरे मंत्री संजय बनसोडे, सर्वश्री आमदार रमेश पाटील, गणेश नाईक, प्रशांत ठाकूर, महेश बालदी, श्रीमती मंदा म्हात्रे, माजी खासदार संजीव नाईक, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. Source CMO Maharashtra  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, नवी मुंबई महानगरपा

फक्त निवणुकिवर डोळा ठेऊन स्वार्थ साधने माझ्या रक्तात नाही - अजित पवार

 आज 14 मार्च रोजी बारामती मध्ये माननीय उप मुखयमंत्री अजितदादा पवार यांची सभा पार पडली त्यावेळी त्यांनी अनेक मुद्यावर चर्चा तसेच भाष्य केले त्यावेळी ते म्हणाले की यंदाही बारामती मध्ये घड्याळाला योग्य तो प्रतिसाद मिळेल. तुमचा सर्व बारामती करांचा आशीर्वाद कायम घड्याळाला असेल व तुम्हा सर्वाचा पाठिंबा व सहकार्य मला मिळेल दादांनी सर्व मतदारांना ही विनंती केली आहे. तसेच समाजातील विविध घटकांना सामावून घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याची माझी भूमिका असेल असेही ते म्हणाले. मुस्लिम समाजाच्या पारंपरिक व्यवसायांना सरकार मार्फत मदत करण्याचे आश्वासन दादांनी या वेळी दिले.  फक्त निवडणूक आहे म्हणून स्वार्थ साधायचा हे माझ्या रक्तात नाही असेही यावेळी दादांनी सांगितले.

कल्याणसह परिसरातील महापालिका, नगरपालिकांसाठी एकत्रित परिवहन सेवा

प्रवाशांना आणखी एक सक्षम वाहतुक पर्याय उपलब्ध करुन देत असल्याचा आनंद -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई दि.13- मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, अंबरनाथ नगरपरिषद व कुळगांव बदलापूर नगरपरिषद या क्षेत्रांची एकत्रित परिवहन सेवा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांना रेल्वे व्यतिरिक्त आणखी एक सक्षम सार्वजनिक वाहतूक पर्याय उपलब्ध करुन देत असल्याचा आनंद होत असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.  मुंबई महानगर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्राच्या नजिकच्या भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, अंबरनाथ नगरपरिषद व कुळगांव बदलापूर नगरपरिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिवहन सेवा उपक्रम पूर्ण क्षमतेने अस्तित्वात नाहीत. या क्षेत्रांमध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमांमार्फत बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात होती. एकत्रित परिवहन सेवा क्षेत्र 225 चौरस किलोमीटर इतके मोठे असणाऱ्या या परिसराची लोकसंख्य

मुंबई मधील 8 रेल्वे स्टेशन ची ब्रिटिशकालीन नावे बदलणार

 मुंबई मधील 8 रेल्वे स्टेशन ची ब्रिटिशकालीन नावे बदलण्याचा निर्णय शासनाने आज मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. ते बदल पुढील प्रमाणे आहेत 1 करी रोड - लालबाग रेल्वे स्थानक 2 Sandhurst Road- डोंगरी रेल्वे स्थानक 3 मरीन लाइन्स - मुंबादेवी रेल्वे स्थानक 4 चर्नी रोड - गिरगाव रेल्वे स्थानक 5 कॉटन ग्रीन - काळा चौकी रेल्वे स्थानक 6 Sandhurst (हार्बर) - डोंगरी रेल्वे स्थानक 7 डॉकयार्ड - माझगाव रेल्वे स्थानक 8 किंग्ज सर्कल - तिर्थकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक Source CMO Maharashtra या मंत्रीमंडळाच्या निर्णयाला विधिमंडळामध्ये मान्यता घेऊन हा प्रस्ताव केंद्रीय गृह व  रेल्वे मंत्रालयाला पाठवण्यात येणार आहे. #मंत्रिमंडळनिर्णय #महानिर्णय #MahaNirnay #CabinetDecision  Source CMO Maharashtra 

पोलिस पाटलाच्या मानधनात मोठी वाढ आता मिळणार महिन्याला 15 हजार रुपये

 पोलिस पाटलाच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा निर्णय राज्य मत्रिमंडळाने घेतला आहे. त्यानुसार आता राज्यातील पोलिस पाटलांचा भत्ता 15000/- रुपये प्रतीमहिना असे मिळणार आहे. सध्या पोलिस पाटलांना 6500/- रुपये इतके वेतन मिळत आहे, आता पोलिस पाटलाच्या जबाबदाऱ्या व कर्तव्यामध्ये वाढ करण्यात आली असून त्यांना सध्या मिळत असलेल्या मानधन कमी असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पोलिस पाटलाची 38 हजार 725 पदे भरaण्याचा निर्णय सुध्धा शासनाने घेतला आहे, व त्यासाठी येणाऱ्या वार्षिक खर्चामध्ये 394 कोटी 99 लाख एवढ्या खर्चाला सुध्धा मान्यता देण्यात आली आहे #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecision #MahaNirnay  Source CMO Maharashtra